शहरात मोटार सायकल चोरी करणारा आणखी एक सराईत चोरटा कोतवाली पोलिसांकडून जेरबंद;कोतवाली,तोफखाना व इतर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी केलेल्या १,८५,०००/रू.किंमतीच्या ४ मोटारसायकल व एक रिक्षा जप्त
नगर प्रतिनिधी(दि.१८ जुन):-अहमदनगर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एक विशेष पथक स्थापन करुन अहमदनगर शहरातील मोटार सायकल चोरी करणारे इसमांचा शोध घेणेबाबत आदेश दिल्याने विशेष पथकातील पोसई/मनोज कचरे,पोना/शाहीद शेख, पोकॉ/प्रमोद लहारे,पोकॉ/सुमित गवळी,पोकॉ/दिपक रोहकले,पोकॉ/सोमनाथ केकान,पोकॉ/अशोक कांबळे,सायबर सेलचे पोकॉ/नितीन शिंदे अशांनी गुप्त बातमी काढून अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्टॅन्ड परीसरात मोटार सायकल व रिक्षा चोरी करणारा इसम सुरज ऊर्फ सोनु शिवाजी शिंदे हा अॅटो रिक्षासह मिळून आल्याने त्याने रिक्षा विषयी चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने त्यास विश्वासात घेवून रिक्षा विषयी अधिक विचारपुस केली असता त्याने ती रिक्षा चिखली पोलीस स्टेशन हद्दीत चोरून आणल्याची कबुली दिल्याने त्याने अहमदनगर शहरात व परीसरात आणखी मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला कोतवाली पोलीस स्टेशन, गुरनं ६०३१/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्या आरोपीवर यापूर्वीचे मोटरसायकल व इतर चोरीचे कोतवाली तसेच तोफखाना पोलीस स्टेशन येथे सात गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक व श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर उपविभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी केली आहे.सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/इखे हे करत आहेत.