प्रतिनिधी (दि.१७ जुन):-पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शासकीय वाळू चोरून वाहतूक करताना डंपर ताब्यात घेऊन दहा लाख 40 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीस अटक करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी हे पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, तालुक्यातील ढवळपुरी ते भाळवणी जाणाऱ्या रोडवर भाळवणी गावाच्या शिवारात एका ढंपर मधून शासकीय वाळू चोरून विनापरवाना बेकायदा वाहतूक करत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने निघून बातमीतील ठिकाणी ढवळपुरी ते भाळवणी जाणारे रोडने भाळवणी गावाच्या शिवारात जावून खात्री केली असता ढवळपुरीकडून भाळवणीच्या दिशेने एक पांढरा राखाडी रंगाचा डंपर येताना दिसला खात्री होताच पोलीस पथकाने सदर डंपर चालकास बॅटरीच्या सहाय्याने थांबण्याचा इशारा केला असता नमुद चालकाने डंपर रोडच्या कडेला थांबविला सदर डंपरची पाहणी केली असता सदर डंपरमध्ये शासकीय वाळू असल्याचे खात्री झाल्याने सदर डंपरमध्ये बसलेल्या चालकास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)नामदेव चंद्रमान खोमणे वय 27 रा.निमगांव घाणा ता.जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले.सदर इसमास डंपरच्या मालकाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले.डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे चोरून वाळू वाहतूक करतांना मिळून आला.ताब्यात असलेल्या डंपरची दोन पंचासमक्ष पाहणी करता त्याचं वर्णन 10,00,000-/ रू. किं.चा एक टाटा कंपनीचा राखाडी रंगाचा डंपर त्याचा क्रमांक एमएच.16.सीसी-2693 असा असलेला जू.वा.कि.अं
2)40,000/- रू. किं.ची 4 ब्रास शासकीय चाळू कि.अं. एकूण 10,40,000/- वरील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने दोन पंचासमक्ष ढंपर व शासकीय वाळूचा पंचनामा पोहेकॉ/ 1848 शिवाजी कदम यांनी जागीच करून वरील मुद्देमाल जागीच जप्त करून ताब्यात घेवून मुद्देमालासह व आरोपी घेवून पोलीस स्टेशनला आले.शासकीय वाळू चोरून वाहतूक करतांना मिळून आल्याने सरकारतर्फे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढाकणे यांनी त्याचे विरुद्ध भादवीक 379 प्रमाणे पारनेर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करून आरोपींना पारनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पोना/रवींद्र कर्डिले,मनोज गोसावी,राहुल गुंडू,पोना/सचिन अडबल,दत्तात्रय गव्हाणे,रणजीत जाधव,किशोर शिरसाट,बाळू खेडकर यांनी केली आहे.
