नगर प्रतिनिधी (दि.१७ जुन):-व्यापाऱ्यास आडवुन अपहरण करुन लुटमार करणारी सराईत आरोपींची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
यातील फिर्यादी श्री.अनिल रामचंद्र घाडगे (वय 48,रा.घोरपडवाडी,ता.राहुरी) हे व त्यांचा ड्रायव्हर ब्रिझा गाडी क्रमांक एमएच/14/जीएस/4422 मधुन राहुरीकडे येत असताना अज्ञात सिल्व्हर रंगाचे कार चालकाने ताब्यातील कार आडवी मारुन अनोळखी चार इसमांनी हातातील कत्तीने गाडीची काच फोडुन फिर्यादी व ड्रायव्हर यांना गाडीचे खाली ओढुन डोळ्यावर पट्टी बांधुन गाडीत खाली बसविले व अज्ञात स्थळी नेवुन कंबरेच्या पट्याने व अज्ञात टणक वस्तुने मारहाण करुन बॅगेमध्ये ठेवलेली रोख रक्कम,गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व हातातील एक तोळा वजनाची अंगठी असा एकुण 10,20,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला व फिर्यादी व साक्षीदार यांना वांबोरी घाटा जवळ सोडुन आरोपी पळुन गेले होता.या घटनेबाबत बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 641/2023 भादविक 394,364 (अ), 323, 341, 504, 506, 34 प्रमाणे अपरहरणासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.नमुद घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना ना उघड गुन्हा उघडकीस आणणे करीता पथक नेमुण समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार केले.व पथकाला कारवाई बाबत सूचना केल्या हे पथक राहुरी व राहाता परिसरात फिरुन ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना दि.16 जुन रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,राहुरी येथील ब्रिझा गाडीतील इसमांना लुटणारे आरोपी हे योगश खरात रा.कोपरगांव व त्याचे साथीदार असुन ते सावळीविहीर फाटा,शिर्डी, ता.राहाता येथे येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.पथकाने तात्काळ सावळीविहीर फाटा,शिर्डी येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना सहा इसम संशयीत हालचाली करताना दिसुन आले.पथकाची खात्री होताच अचानक त्यांचेवर छापा घालताच त्यातील दोन इसम गर्दीचा फायदा घेवुन पळुन गेले व उरलेल्या चार इसम हे देखील पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना त्यांचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे
1)योगेश कैलास खरात वय 24,रा.भोजडे चौक,ता.कोपरगांव,2)अनिल आण्णासाहेब मालदोडे वय 30,रा. पिंपळवाडी,माऊली नगर, शिर्डी,ता.राहाता,3)गुड्डू ऊर्फ सागर विठ्ठल मगर वय 21,रा.हनुमानवाडी, कान्हेगांव,ता.कोपरगांव व 4) सोनु ऊर्फ सोन्या सुधाकर पवार वय 25, रा.हॉलीडे पार्क शेजारी,शिर्डी,ता.राहाता असे सांगितले.त्यांना विश्वासात घेवुन पळुन गेलेल्या इसमांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे 5)धनंजय प्रकाश काळे रा.रामवाडी,सवत्संर,ता.कोपरगांव (फरार) व 6) मयुर अनिल गायकवाड रा. इंदीरानगर,ता.कोपरगांव (फरार) असे सांगितले.ताब्यातील चार आरोपींकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाचे विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हा करणे करीता त्यांना 7)किरण बबन कोळपे रा.विळद,ता.जि. अहमदनगर,8)आकाश पांडुरंग शिंदे रा.पाण्याचे टाकीजवळ,विळद,ता.जि. अहमदनगर,9) महेश विठ्ठल वाघ व 10)सोनु ऊर्फ शुभम रावसाहेब ठोंबे,दोन्ही रा. खांडके,ता.जि.अहमदनगर यांनी मदत केली असल्याचे सांगितले.त्यानुसार सदर आरोपींना सोबत घेवुन आरोपी क्रमांक 7 ते 10 यांचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीकडुन गुन्ह्यात जबरीने चोरी केलेल्या मालमत्ते पैकी 2,01,000/- रुपये रोख रक्कम, 1,20,000/- रु. किंमतीची सोन्याची चैन, गुन्हा करणेसाठी वापरलेले 7,00,000/- रुपये किंमतीची सिल्व्हर रंगाची डस्टर वाहन, एक 100/- रुपये किंमतीचा रामपुरी चाकु व आरोपींचे ताब्यातील 1,35,000/- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण 10,36,100/- रुपये किंमतींचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींना ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील कारवाई राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.यातील आरोपी नामे सोन्या ऊर्फ सोनु सुधाकर पवार,वय 25,रा. साकुरी ता.राहाता हा 1) शिर्डी 01/2023 भादविक 302 व 2) राहाता 33/2022 भादविक 379 या दोन गुन्ह्यात फरार आहे. तसेच पळुन गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.आरोपी नामे योगेश कैलास खरात हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दरोडा,दरोडा तयारी, जबरी चोरी,चोरी आर्म ऍ़क्ट व सरकारी कामात अडथळा असे गंभीर स्वरुपाचे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत.तसेच आरोपी नामे धनंजय प्रकाश काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दरोडा, दरोडा तयारी,आर्म ऍ़क्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण -09 गुन्हे दाखल आहेत.आरोपी नामे मयुर अनिल गायकवाड हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण -02 गुन्हे दाखल आहेत.तसेच आरोपी नामे आकाश पांडुरंग शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दरोडा,दरोडा तयारी,जबरी चोरी, आर्म ऍ़क्ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण -06 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/मनोज गोसावी,अतुल लोटके, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,पोना/सचिन आडबल,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,संतोष खैरे,विजय ठोंबरे,गणेश भिंगारदे,फुरकान शेख,पोकॉ/आकाश काळे,शिवाजी ढाकणे,रणजीत जाधव,अमृत आढाव,मेघराज कोल्हे,बाळासाहेब गुंजाळ,प्रशांत राठोड,किशोर शिरसाठ,चापोहेकॉ/उमाकांत गावडे व अर्जुन बडे यांनी केली आहे.
