अहमदनगर प्रतिनिधी (दि.२९ जुन):-भिंगार शहराजवळ असलेले नागरदेवळे,वडारवाडी,शहापूर केकति,बाराबाबळी व इतर गावामध्ये रोजगारा साठी बाहेर राज्यातून येणाऱ्या परप्रांतीय कामगारांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून ते आपल्या कुटुंबासह भाडेतत्त्वावर राहत आहेत. तसेच घर मालकाकडे त्यांचा कुठलाही मूळ पत्ता नसल्याने तरीही त्यांना भाडेतत्त्वावर रूम दिलेले आहेत.त्यामुळे काही गुन्हेगार येथे आसरा घेऊन राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यांच्याकडून भविष्यात कोणताही गुन्हा घडू शकतो सध्या परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढलेला आहे.तरी पोलीस स्टेशन मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करण्यात यावे की परप्रांतीय नागरिकांची रजिस्टर तयार करून त्यांची नोंद करण्यात यावी त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या गुन्हेगारांना चाप बसेल तसेच जर भविष्यात एखादा गुन्हा घडल्यास त्याची तपास कामात प्रशासनास मदत होईल.असे निवेदन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सांळुके यांना देण्यात आले.या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हाउपाध्यक्ष राहुल लखन,सामाजिक कार्यकर्ते तालेवार गोहेर,पवन सेवक,दिलीप सूर्यवंशी,धिरज बैद आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
