प्रतिनिधी (दि.२९ जुन):-आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लताताई शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली.यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली.यावेळी त्यांनी बळीराजाला,कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणं विठुरायाच्या चरणी मागितलं. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई आणि घर भत्ता मंजूर करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.या शासकीय महापूजे वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.याच बरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,कामगार मंत्री सुरेश ख्याडे,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री दादा भुसे,खासदार श्रीकांत शिंदे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी,देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.नेवासा तालुक्यातील वारकऱ्यांचा काळे कुटुंबीयांचा यांना मान मिळाल्यामुळे नेवासा तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण वारकऱ्यांमध्ये पाहावयास मिळत आहे.त्या संदर्भात ज्ञानेश्वर देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी व ज्ञानेश्वर देवस्थानचे विश्वस्त हभप पांडुरंग अभंग यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
