रोड रॉबरी करून तीन म्हशींसह पिकअप पळविणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारास बीड येथे जाऊन एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३ जुलै):-रोड रॉबरी करुन तीन म्हशींसह पिकअप पळविणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीतील एका सराईत आरोपीस बीड येथुन ५,१०,०००/- रुपयांच्या मुददेमालासह जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. घटनेतील हकीकत अशी की,एमआयडीसी पोलीस ठाणे मध्ये दि.१७/०६/२०२२ रोजी फिर्यादी दिनेश महादेव मोरे,वय २३ वर्षे,धंदा ड्रायव्हर,मु.पो.राहु,ता.दौंड, जि.पुणे,यांनी फिर्याद दिली होती की ते दौंड येथुन घोडेगाव जनावरांचे बाजारात म्हशी या पिकअपमध्ये भरुन विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांना त्याच दिवशी रात्री-०२/०० वाजण्याच्या सुमारास नगर औरंगाबाद रोड जेऊर गावचे शिवारात,हॉटेल शिव जवळ, एकुण ३ आरोपी यांनी फिर्यादीच्या पिकअप समोर मोटार सायकलवर येवून त्यांचे ताब्यातील मोटार सायकल फिर्यादीचे पिकअपला आडवी लावुन त्यांना धारदार हत्याराचा धाक दाखवून शिवीगाळ करुन फिर्यादीजवळ असलेले पिकअप,एकुण ०३ म्हशी ही जनावरे,तीन मोबाईल हॅण्डसेट,रोख रक्कम रुपये ९,०००/- असा मुददेमाल चोरुन नेलेला होता.त्यापैकी यापुर्वीच म्हशी चोरणारे दोन व म्हशी विकत घेणारा एक असे एकुण तीन आरोपी यापुर्वी अटक करण्यात आलेले असुन त्यांचा एक साथीदार मुख्य आरोपी नामे समाधान बाबुराव खिंडकर,रा.बेलवाडी,ता.जि-बीड हा सराईत आरोपी असुन तो आज पर्यंत फरार होता.सदर गुन्हयाचा तपास करत असताना सदर गुन्हयातील फरार आरोपीत याचा शोध घेतला असता तो बीड शहर परिसरात असल्याबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने त्यास अटक करण्यासाठी प्रभारी अधिकारी सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक रवाना केले होते. त्यावेळी पोलीस पथकाने पिंपळनेर बीड येथे जावुन आरोपीत याची गोपनीय माहीती काढुन त्यास ताब्यात घेवून त्यास अटक केलेली असुन त्याचे कडुन पिकअपसह ३ म्हशी असा ५,१०,०००/- रुपयांचा मुददेमाल करण्यात आलेला आहे.अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरोधात अ.नगर, बीड,पुणे येथे तब्बल १२ गुन्हे दाखल आहे.सदरची कामगिरी ही श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री.राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पो.स्टे,पोउपनिरी/चांगदेव हंडाळ,पोकॉ/गजानन गायकवाड,पोशि/किशोर जाधव,पोशि/भगवान वंजारी,पोशि/ज्ञानेश्वर तांदळे,पोशि/सुरज देशमुख,होमगार्ड/गणेश सुरेश वाघ,मोबाईल सेल मपोशि/रिंकु माढेकर,पोकॉ/नितीन शिंदे यांचे पथकाने केली आहे.