Maharashtra247

आजीला भेटायला आलेल्या नात जावयाला शिवीगाळ करून केली जबरदस्त मारहाण,गाडीची केली तोडफोड

अकोले प्रतिनिधी (दि.१४. डिसेंबर):-घरातील वृद्ध आजेसासूला भेटायला आलेल्या नात जावयाची गाडी फोडून काढली,ही घटना रस्त्याच्या वादातून घडली. मात्र,अहमदनगर अकोले तालुक्यात कोतूळ परिसरात घडली.कोतूळ येथील सुरेश वामन देशमुख यांच्या व लक्ष्मण नामदेव गोडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचा वाद न्यायालयात सुरू आहे.दरम्यान,सुरेश देशमुख यांच्या नव्वद वर्षे वयाच्या आईची तब्येत ढासळली असल्याने,अनेक पाहुणे भेटायला येत होते. दरम्यान,वृद्ध आजीचे नातजावई व सुरेश देशमुख यांचे जावई अमोल सुधाकर आरोटे या संगमनेर येथून रविवारी रात्री आठ वाजता कोतूळला भेटायला आले असता,या वादाचे रस्त्याच्या कडेला हुंदाई कंपनीची चारचाकी गाडी उभी केली होती.लक्ष्मण गोडे व जितेंद्र गोडे यांनी आरोटे यांना शिवीगाळ मारहाण केली, तसेच लक्ष्मण गोडे,भरत नामदेव गोडे,जितेंद्र लक्ष्मण गोडे,इंदिरा लक्ष्मण गोडे, सरला भरत गोडे व अन्य दोघे अनोळखी यांनी आरोटे यांच्या चारचाकी गाडीला दगडाने ठेचून काढले रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.अकोले पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली, पोना/बाळासाहेब गोराणे पुढील तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page