अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ जुलै):-जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आखतवाडे येथे साडेपाच लाखांचा गांजा जप्त करण्यास शेवगाव पोलिसांना यश आले आहे.मोसंबीच्या बागेत शेतकऱ्याने गांजाची लागवड केली होती.पोलिसांनी छापा टाकून शेतातून तब्बल ५ लाख ६५ हजार रुपये किमतीची ११३ किलो वजनाची १२९ गांजाची झाडे जप्त केली.व शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.अरुण बाजीराव आठरे ( ४४,रा.बोरवल वस्ती आखतवाडे तालुका शेवगाव ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेवगाव पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन अधिकारी रेड्डी यांना आठरे यांनी मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळाली होती.याची खात्री झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सपोनी विश्वास पावरा, आशिष शेळके,पोहेकॉ परशुराम नाकाडे,उमेश गायकवाड,सुजित सरोदे, सुनील रत्नपारखे,सचिन खेडकर,एकनाथ गर्कल,वैभव काळे,रुपाली कलोर यांचे एक पथक तयार करून छापा टाकण्याचे आदेश दिले. सदरील पथकाने छापा टाकला असता यावेळी तेथे तब्बल १२९ गांजाची झाडे आढळून आली.या झाडांचे वजन मापे निरीक्षक कुलकर्णी यांच्या समक्ष इलेक्ट्रिक काट्यावर वजन केले असता ते ११३ किलो भरले पोलिसांनी ती जप्त केली.पोहेकॉ/ परशुराम नाकाडे यांच्या फिर्यादीवरून आठरे यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याचे विरुध्द शासनाने बंदी घातलेल्या गांजाच्या झाडाची बेकायदेशीर लागवड करून ती वाढविलेल्या स्थितीत मिळवून आल्याने एन डी पी एस कायदा सन १९८५ चे कलम २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
