अहमदनगर(दि.१५ जुलै):-जिद्द,मेहनत व कोणतेही काम करण्याची तयारी हे गुण यशप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात.

त्यामुळे कोणतेही काम छोटे वा मोठे न समजता कष्ट घेऊन शिक्षण घेतले पाहिजे,असे मत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले.नगर येथील भाऊ बाळाजी जाधव समता विकास मंडळ संचलित उद्धव अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना ते बोलत होते.शाळेच्या “विद्यार्थी पदाधिकारी नेमणुक” समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना बोलाविण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रशालेची शिस्त राखण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असावा म्हणुन विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले चंद्रशेखर यादव मार्गदर्शन करताना म्हणाले की,जिद्द,मेहनत व कोणतेही काम करण्याची तयारी हे नेतृत्व गुण आपणास यशप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात.तसेच,कोणतेही काम छोटे अगर मोठे समजून लाजू नये. मिळेल ते काम करून अभ्यास करावा. त्यासोबतच आपले आई-वडील शिक्षक थोर मंडळींचा मानसन्मान ठेवावा. त्यासोबतच, कुठेही काही अनुचित प्रकार घडल्यास कुणालाही न घाबरता त्याची माहिती आपल्या आई-वडिलांना किंवा पोलिसांना द्यावी,असे पोलीस निरीक्षक यादव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.मुलींना घराचे जवळपास ओळखीच्या तसेच अनोळखी लोकांकडून त्रास होतो, प्रवासामध्ये तसेच शाळेच्या येण्या-जाण्याचा मार्गावर कोणीही कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास,विनयभंगाचा प्रकार घडल्यास तात्काळ कोतवाली पोलिसांची संपर्क साधावा आपले नाव गोपनीय ठेवून ठेवून कारवाई करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले.यावेळी प्राचार्या निशिता जाधव,जयंत जाधव,अनिल दारकुडे आणि इतर शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांची उपस्थिती होती.
