अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ जुलै):-“आपकी बार किसान सरकार” हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रात आपल्या पक्ष वाढीसाठी भारत राष्ट्र समिती (BRS) पक्ष जाहीर सभा घेऊन पक्षप्रवेश सोहळा घेत आहेत.त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये पक्षाचे मा.खासदार श्री.बी.बी.पाटील यांच्या उपस्थितीत स्वयंवर मंगल कार्यालय येथे जाहीर सभा व पक्षप्रवेश सोहळा दि.16 जुलै रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित केला आहे.या जाहीर सभेला व तसेच पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे नेते अशोक बागुल यांनी केले आहे.
