अहमदनगर प्रतिनिधी(दि.१६ जुलै):-पाईपलाईन रोडवरील एकविरा चौक येथे काल शनिवार 10 वाजेच्या सुमारास रात्री राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर काहि इसमानी प्राण घातक हल्ला केला होता.या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.ही घटना समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या मित्र परिवारांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.या हल्ल्या प्रकरणी भाजपाचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अन्य आठ ते दहा जणांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे.तोफखाना पोलीस आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
