अहमदनगर प्रतिनिधी (दि.१६ जुलै):-साडे तिन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणा-या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या तीन तासात पकडले.बातमीची हकीकत अशी की,दि.१६ जुलै रोजी दुपारी चेतना कॉलनी येथील रहीवासी असलेल्या फिर्यादी या भाडोत्री खोली बघण्याकरीता गेले असता त्यांचे सोबत त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा प्रतिक हा होता.फिर्यादी चेतना कॉलनी येथे भाडोत्री रुम पाहत असताना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर उभा होता.फिर्यादी रुम पाहून खाली आल्यावर त्यांना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर दिसला नाही. त्यांनी आजु बाजुला पाहीले त्यांना मुलगा प्रतिक कोठेच मिळुन आला नाही त्यांनी आजु बाजुला विचारले की येथे लहान मुलगा पाहीला का तेव्हा तेथील लोकांनी त्यांना सांगीतले की आत्ताच थोडया वेळापूर्वी एक ३०-३२ वर्षाच्या एक इसम त्याला त्याचे बरोबर घेवून गेला तेव्हा फिर्यादी यांची खात्री झाली की माझ्या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे.त्यांनी लगेच ११२ नंबर वर फोन करुन मुलगा प्रतिक यास एक अनोळखी इसमाने माझे संमत्ती शिवाय घेवुन गेला आहे असे सांगीतल्यावर सदर घटनेचा फोन कंट्रोल वरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राप्त होताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि/सानप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून ताबडतोप घटना ठिकाणी जावुन भेट दिली. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पथकातील कर्मचारी यांनी सदर घटने बाबत तात्काळ माहिती घेतली असता त्यांना मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात एक इसम एका लहान मुलासह संशयीत रीत्या फिरत असल्याचे माहिती मिळाली. सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात शोध घेतला असता जेथे एक इसम हा त्याचे सोबत असलेला मुलगा पथकातील कर्मचारी यांना दिसला.लगेच फिर्यादी यांना तो दाखवला असता फिर्यादीने ओळखले कि हा त्यांचाच मुलगा प्रतिक आहे त्यावेळी त्याला घेवून फिरणाऱ्या संशयीत इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र बबन थोरात (रा.शेवगाव) असे असल्याचे सांगीतले त्यास मुलाबाबत अधिक विचारपुस केली असता त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस स्टेशनला आणल्यावर फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरजिनं ६२३/२०२३ भादवीक ३६३ प्रमाणे रोजी दाखल करण्यात आला.व आरोपीस या गुन्हात अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.सदरची कामगिरी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप,पोसई/ गायकवाड,पोहेकॉ/नंदकुमार सांगळे,पोना/मिसाळ,पोकॉ/ सानप,पोकॉ/सुरज देशमुख, पोकॉ/जयसिंग शिंदे,मपोकॉ/पठाडे व मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंड व पोशि/नितीन शिंदे यांनी केली आहे.
