विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
संगमनेर प्रतिनिधी (दि.१४. डिसेंबर):-गाळा घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणावेत या मागणीसाठी गळ्यातील ओढणीने विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील हाजी नगर परिसरात घडली आहे.या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पती नजर रियाज पठाण,दीर अजहर रियाज पठाण,सासरा रियाज ताजखान पठाण व सासू आरिफा रियाज पठाण (सर्व रा.हाजीनगर) यांच्या विरोधात भादंविक ३०७ सह हुंडा प्रतिबंधक कायदा कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.विवाहितेचा पती नजर व दीर अजहर या दोघांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे करत आहेत.