आठ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरी
श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१४.डिसेंबर):-श्रीगोंदा शहरासह परिसरात राजरोस खुलेआम पणे जबरीचोरी,घर फोडी अश्या चोऱ्या चालू असून,या चोऱ्या आटोक्यात आणण्यास स्थानिक पोलीस प्रशासन अकार्यक्षम ठरले असून तर,सर्वसामान्यांच्या मुद्देमालाचे संरक्षण आता स्वतःच्याच भरोसे असल्याचे श्रीगोंदा तालुक्यात पहावयास मिळत आहे.शेंडगे वस्ती,दोन दरवाजे,गट नंबर 2323 मधील बंडू पांडुरंग क्षिरसागर राहणार तेली गल्ली,श्रीगोंदा यांच्या शेत तळ्यातून आठ हजार रुपये किमतीची स्वराज कंपनीची तीन एचपी इलेक्ट्रिक मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.बंडू क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात इसमा विरोधात भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोना विकास वैराळ पुढील तपास करीत आहे.