पंचायत समितीच्या ऑफिसचा दरवाजा तोडून कॉम्पुटर व सीपीयू चोरट्यांनी केला गायब
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८ जुलै):-श्रीरामपूर शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून चोरीचे सत्र सुरूच आहे. त्यातच पंचायत समितीच्या ऑफिसच्या बंद दरवाजाचे कडी कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून ७२००० रू. किमतीचे संगणक (कॉम्पुटर) सीपीयू चोरून नेले.ही घटना १६ जुलै रोजी रात्री ७.०० वाजेच्या दरम्यान घडली आहे.दत्तात्रय पुनिलाल साळुंके (धंदा नोकरी-परिचर, रा.दशमेश नगर वार्ड नंबर १,श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरक्र ७२४/२०२३ भादविक ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ/खेडकर करीत आहेत.