अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८ जुलै):-कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला पोलीस यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी अशांना बोलावुन घेवुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले.पथक फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना दि.17 जुलै रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,कर्जत येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे शुभम चव्हाण हा (भांबोरा,ता.कर्जत) येथील त्याचे राहते घरी आला आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन कोरेवस्ती,भांबोरा ता.कर्जत येथे जावुन खात्री करता बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम घरा बाहेर उभा असलेला दिसला.पथकाची खात्री होताच त्यास ताब्यात घेतले.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)शुभम ऊर्फ काळ्या नितीन ऊर्फ आसमानता-या चव्हाण,रा.कोरे वस्ती,भांबोरा,ता.कर्जत असे असल्याचे सांगितले.त्याचे कडे कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं.770/22 भादविक 302, 324, 323, 504,34 या गुन्ह्याबाबत विचारपुस सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवुल लागला,त्यास अधिक विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधीकारी कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/रविंद्र कर्डीले,पोना/सचिन आडबल,विजय ठोंबरे,पोहेकॉ/भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर यांनी केलेली आहे.
