अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ जुलै):-राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे अवैध शस्त्रे बाळगणारा आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना आगामी सण उत्सव अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राहुरी परिसरात फिरुन अवैध शस्त्रे व हत्यारे बाळगणा-या आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.पथक राहुरी परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना दि.20 जुलै रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे नागेश चव्हाण (रा.मोमीन आखाडा,ता.) राहुरी हा कब्जात अवैध शस्त्रे बाळगुन राहुरी येथील मल्हारवाडी जाणारे रोडवर यामाहा आर 15 मोटार सायकलवर फिरत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.पथकाने लागलीच मल्हारवाडी रोडने जावुन सापळा लावुन थांबलेले असताना.संशयीत दोन इसम यामाहा आर-15 मोटार सायकलवर येताना दिसले. पथकाची खात्री होताच संशयीतांना थांबवुन ताब्यात घेत असताना मोटार सायकलवर पाठीमागे बसलेला एक इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच गाडीवरुन उडी घेवुन अंधारात पळुन गेला.पथकाने मोटार सायकल चालवणा-या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे 1)नागेश संजय चव्हाण,वय 21,रा.मोमीन आखाडा,ता.राहुरी असे सांगितले.त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत व यामाहा आर-15 मोटार सायकलचे सिट खाली कापडी पिशवीमध्ये 550/- रुपये किंमतीचे दोन चाकु 500/- रुपये किंमतीची एक तलवार व 80,000/- हजार रुपये किंमतीची यामाहा आर-15 मोटार सायकल असा एकुण 81,050/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले.आरोपींकडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 2) अक्षय बाचकर रा. गडदे आखाडा,ता.राहुरी (फरार) असे सांगितले. आरोपींचे पळुन गेलेल्या साथीदाराचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे ने.स्थागुशा, अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन राहुरी पोलीस स्टेशन येथे आर्म ऍ़क्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग अतिरिक्त प्रभार श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/अतुल लोटके,पोना/रविंद्र कर्डीले,विशाल दळवी,पोकॉ/शिवाजी ढाकणे,पोकॉ/रणजीत जाधव,रोहित मिसाळ,संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.
