Maharashtra247

श्री.साई इंग्लिश मिडीयम आणि ज्युनिअर कॉलेज येथे बाल संसदेसाठी विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न

 

अहमदनगर (दि.४ ऑगस्ट):-दि.३ ऑगस्ट रोजी श्री.साई इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे २०२३-२४ या सत्रासाठी बाल संसदेची (Child Cabinet) स्थापना करण्यासाठी विद्यार्थी परीषद निवडणूक (Students Council Election) घेण्यात आली.या निवडणुकीसाठी इयत्ता ३ री व १० वी या वर्गाचे ३३ उमेदवार 10 मंत्रिपदासाठी रिंगणात उभे होते.या 10 मंत्री पदामध्ये पंतप्रधान,उपपंतप्रधान, सांस्कृतिक मंत्री,आरोग्य मंत्री,खेळमंत्री,शिस्त आणि सुव्यवस्था मंत्री आणि अन्न मंत्री ई.पदांचा समावेश करण्यात आला होता.८९.५३ % विद्यार्थ्यानी यावेळी मतदानाचा हक्क बजावला.शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वरील उमेदवारांना मतदान केले. बाल मतदारांना प्रेरणा मिळावी म्हणून संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष अशोक कानडे यांनी आपला वेळातला वेळ काढून आपला मतदानाचा हक्क बजावला आणि विद्यार्थ्यांसमोर लोकशाही मूल्यं रुजवनारा आदर्श प्रस्थापित केला.विद्यार्थी परिषद निवडणूक ही संविधानाची कलम ३२४ नुसार आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार संपन्न करण्यात आली.दि.२७/७/२३ रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.निवडणुकीची आचारसंहिता २८/७/ २०२३ रोजी लागू करण्यात आली. उमेदवारी अर्ज म्हणून गुगल फॉर्म तयार करण्यात आला आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दि.०१/८/२३ मंगळवार हि होती.पात्र उमेदवारांनी ऑनलाईन गुगल फॉर्म हा अर्ज भरून आपली उमेदवारी निश्चित केली.निडणुकीसाठी उमेदवारांना चिन्हे देण्यात आली होती. उमेदवारांनी लोकशाही मार्गाने आणि आचारसंहितेचा भंग न करता प्रचार केला.दि.०३/८/२३ रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.या साठी निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला बॅलेट पेपर आणि बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली होती.निवडणूक कक्ष अधिकारी श्रीमती.प्रज्ञा भागवत,निवडणूक कक्ष उप अधिकारी श्री.प्रसाद पाटोळे,निवडणूक स्तर अधिकारी (बी.एल.ओ.) म्हणुन श्रीमती.सोनाली नालकर तसेच निवडणूक निरीक्षण अधिकारी श्रीमती. पूनम पानसरे,श्रीमती प्रिया मल्होत्रा,श्रीमती पल्लवी चोरगे,माधुरी जाधव यांनी निवडणूक तथा मतदानाचे पूर्ण कामकाज पाहिले. श्रीमती.मंदा तायडे आणि श्री. संजय घाडगे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले.तांत्रिक अधिकारी श्री.विशाल गायकवाड आणि श्री.राजू डोईफोडे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानासाठी लागणाऱ्या गोष्टींची म्हणजेच बॅलेट पेपर,बॅलेट बॉक्स, मतदारयादी आणि इंक पूर्तता केली.विद्यार्थी परिषद निवडणूक यशस्वी संपन्न करण्यासाठी एज्युकेशनल डायरेक्टर डॉ.अर्जुन राठोड, प्राचार्या श्रीमती.तनुजा लोंढे यांनी महत्वाची भुमिका बजावली तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.लोकशाही ला बळकट करणारी प्रक्रिया म्हणजेच निवडणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

You cannot copy content of this page