अहमदनगर(दि.७ ऑगस्ट):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अरमान नईम शेख ऊर्फ टिल्लू वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.सोशल मिडीयावर संभाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत हीन व खालच्या पातळीचे वक्तव्य आरोपी अरमान नईम शेख याने केलेले आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे दैवत असून त्यांच्या सारखा राजा जगात कुठलाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबददल अशा प्रकारचे हिन व निंदनीय व खालच्या प्रकारचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे.आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच अशा प्रकारचे वक्तव्य करण्यास प्रोत्साहन देणाऱ्याचा पोलीसांनी शोध लावावा व कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाबुशेट टायरवाले,जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव,भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अँड.अभय आगरकर,संग्राम शेळके,महेश लोंढे,सागर गायकवाड,सुनिल लालबोंद्रे,भारत कांडेकर,काका शेळके, पोपटराव पाथरे,अनिकेत कराळे,मयुर गायकवाड,ओम भिंगारदिवे,शुभम कुलकर्णी,पांडुरंग घोरपडे,दामोदर भालसिंग आदी उपस्थित होते.
