अहमदनगर(दि.७ ऑगस्ट):-मित्रावर जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.राम अंकुश इंगळे (वय २८ वर्षे,रा.निंबोडी,ता.जि.नगर) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.कोतवाली पोलिसांनी आरोपीला निंबोडी येथून अटक केली आहे.नगर शहरातील नेवासकर पेट्रोल पंपाजवळ कोठी येथे रविवार दि.६ रोजी सागर दत्तात्रय जाधव (वय २९ वर्षे धंदा- खाजगी नोकरी, रा.निंबोडी,ता.जि.अहमदनगर) यांच्यावर चाकूने हल्ला झाला.सागर जाधव यांना त्यांचाच मित्र असलेल्या राम अंकुश इंगळे याने काम असल्याचे सांगून बोलून घेतले होते. त्यानंतर सागर जाधव यांच्यावर चाकूने एक वार करून जखमी केले.सागर जाधव यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळवली होती की आरोपी निंबोडी येथे आहे.या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला तात्काळ अटक केली.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोसई गजेंद्र इंगळे,पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,सलीम शेख,योगेश खामकर, रियाज इनामदार,अभय कदम,संदिप थोरात,अमोल गाढे, कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत,सुजय हिवाळे,अतुल काजळे,सागर मिसाळ मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांनी केली आहे.
