अहमदनगर (दि.८ ऑगस्ट):-महसूल सप्ताह साजरा करण्याच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी कोठेवाडीला भेट देवून तेथील समस्यांचा आढावा घेतला.महसूल सहायक अशोक मासाळ यांना ऑफिस मधून शिपायाकडून निरोप आला.

समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन बालाजी क्षीरसागर यांनी तुम्हाला कार्यालयात बोलविले आहे.निरोप मिळताच तात्काळ कार्यालयात गेलो असता उपजिल्हाधिकारी यांनी बसण्यास सांगितले.अशोक आपल्याला शासन स्तरावरून महसूल सप्ताह साजरा करण्यासंदर्भात सुचना निर्देश आहेत त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ सर व सुहास मापारी अपर जिल्हाधिकारी सरांनी शासनाच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत तुला काय वाटत आपण कश्या पद्धतीने महसूल सप्ताह साजरा करावा.माझ्या साठी अचानक आलेल्या या प्रश्नावर विचार करून उत्तर द्यावं लागणार तेव्हा सर म्हणाले जे लोक शासनाच्या योजना किंवा आपल्या हक्कांविषयी अनभिज्ञ आहेत असे लोक शोध आपण स्वतः त्यांच्या कडे जाऊन त्यांच्या समवेत एक दिवस राहून चर्चा करू त्यांचे प्रश्न जागेवर सोडवु,तस पाहिलं तर असा विचार कधीच कुणी करताना दिसत नाही प्रशासकीय अधिकारी म्हणून बाबरत असताना सामान्य वंचित आणि दुर्गम भागात राहणार्या लोकांविषयी असलेली क्षीरसागर सरांची तळमळ मला क्षणात जाणवली.पुढचा विचार होता कुठला तालुक्यात जाऊन काम करायचं सरांना दोन तीन तालुक्यांच्या संदर्भात सुचवलं कि तिथं जाऊन आपण काम करू यावर देखील सरांचं उत्तर तयार होत आपण पाथर्डी ला जाऊ त्याठिकाणी अनेक दुर्गम भाग आहेत तिथं आपण जाऊ तिथं माणिकदौंडी मंडळात अनेक दुर्गम डोंगराळ भागात असणारं गावे आहेत तू तिथं असणारे तलाठी राजु मेरड ह्यांना संपर्क करून कळव आम्ही येतोय किंवा कॉन्फरन्स कॉल वर त्यांना तात्काळ फोन लावून आदेश येताच तलाठी मेरड यांच्या सोबत बोलणं झालं संध्याकाळी साहेबांसोबत कॉन्फरंस कॉल वर बोलू असं ठरलं साहेबांनी आम्हाला दोघांना बीड जिल्हा सीमेवर असणाऱ्या पण पाथर्डी तालुक्यातील असणाऱ्या कोठेवाडी या डोंगरात अशा असणाऱ्या गावात जाऊन समस्या जाणून घेऊ असा आदेश प्राप्त होतांच राजूभाऊ मेरेड अतिशय आनंदी झाले.कारण असे कमी अधिकारी त्यांनी पाहिलेत कि ज्यांना दुर्गम भागात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या आज रविवारी भल्या सकाळी आम्ही कोठेवाडी या गावात पोचलो हो हे तेच गाव आहे जिथे २००९ साली सगळ्या गावात दरोडा घालून काही दरोडेखोर नराधमांनी महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल असे कृत्य केलेलं आजही ग्रामस्थ त्या काळ्या दिवसाच्या भीती खाली जगतायत..ते आम्ही ज्या कोठेवाडी गावात गेलेलो ते नव्याने पुनर्वसित पण दुर्गम भागात गावकर्यांनी अतिशय आनंदाने आमचं स्वागत केलं त्यात प्रामुख्याने कोठेवाडी वस्ती येथील सरपंच संजय सर्जेराव चितळे,दत्तू कोठे,विष्णू कोठे, गोरख कोठे,मुरलीधर कोठे, किशोर पवार,गिन्यानदेव कोठे,पोलीस पाटील वसंत अशोक वाघमारे,कोतवाल लतीफ भाई उपस्थित होते.गावच्या कड्यावर सभेसारखी गर्दी लोटली त्यात लहामोठ्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत गर्दी लोटली पोलीस पाटील बाघमारे यांनी साहेबांच स्वागत केलं तलाठी राजूभाऊ मेरड यांनी आमची ओळख आणि गावात येण्याचं प्रयोजन सांगितलं चर्चा सुरु झाल्या. आज देखील तिथल्या लोकांचे अनेक प्रश्न होते हळूहळू हे समोर यायला लागलं त्यात प्रामुख्याने पोलीस चौकी कायम करावी.डोंगरी विकास योजनेत गावाचा समावेश करावा पाझर तलाव संपादन याबाबत कामकाज त्वरित व्हावं.रेशन धान्य दुकान पुरवठा विभागाचा भाग गाव तोडून देणे जेणेकरून लोकांना मोठं अंतर चालत जाऊन धान्य आणायचा त्रास कमी होईल आणि पुनर्वसन अंतर्गत रस्ते करणे हे मुद्दे प्रकर्षानि मांडले.ह्या सर्व मुद्द्यावर महत्वाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा झाली परंतु तिथं फोन देखील कव्हरेज नसल्याने व्यवस्थित बोलता आलं नाही हि शोकांतिका आज तंत्रज्ञानाच्या युगात आहे हि खंत क्षीरसागर सरांना वाटली.गावातील युवकाशी त्यांच्या पालकांशी बोलताना युवकांनी मोठेपणा करण सोडावं अंगी नम्र भाव असावा शिकण्याची वृत्ती असावी त्याच बरोबर आपल्या पायावर उभं राहून नोकरीच्या भरवश्यावर न राहता आपल्या अंगी एखाद कौशल्य बाळगलं तरच आपण स्पर्धेच्या युगात टिकू आणि परिस्थीशी संघर्ष केला तरच आपण मोठे होऊ हा सल्ला दिला. शिक्षण नोकरी धंदा याकारणासाठी गाव सोडलं तर गावाशी असलेली नाळ न तोडता गावाला मोठं केलं पाहिजे हा मोलाचा सल्ला युवकांना दिला. गावकर्यांनी ह्या गोष्टीला टाळ्यांनी दुजोरा दिला तिथून गावकऱ्यांचा सन्मान स्वीकारत आम्ही निघालो.नियोजन करण्या विषयी तलाठी मेरड भाऊसाहेबांना सूचना दिल्या ग्रामसेवकाला त्याच्या अखत्यारीत असलेल्या योजनांविषयी ह्या लोकांसाठी काम करण्याच्या सूचना देऊन कार्यवाही सुरू करणेचे निर्देश दिले.जाताना तलाठी भाऊसाहेबांनी गावातील एका कुटुंबियांच्या घरी येण्या विषयी विनंती केली प्रवीण राजू गायकवाड असं त्यांचं नाव एका छोट्याश्या घरात हे सैनिक कुटुंब मागील अनेक वर्षांपासून राहतंय ह्यांची तिसरी पिढी देशाची सेवा करतीय हे ऐकताच साहेबानी आपुलकीने त्यांच्या समस्या विचारल्या समाधानी असणान्या ह्या बहादूर सैनिकांनी सर आम्हाला काहीच समस्या नाही पण सैनिकांना कुठं जमिन मिळती आम्हाला मिळेल का किंवा आमच्या ऐवजी आणखीन गरजू शाहिद पत्नी किंवा कुटुंब यांना द्या पण आपण आमच्या घरी आला आणि एवढं विचारत हेच आमचा भरून आणणार आहे असं म्हणताच वातावरण भारावून गेलं त्यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.पूर्वी आम्ही याच भागात गावापासून पुढं अत्यंत दुर्गम भागात जिथवर गाडी जाते तिथून पुढे पायवाट निसाडा रस्ता दगड धोंड्यातून तोल सावरत कधी चिखल तुडवत तर कधी पाण्याचा डोह ओलांडत डोंगर चढून आम्ही वाडीवस्ती गाठली ती भील्ल आदिवासी वस्ती होती तिथल चित्र मनाला सुन्न करून विचार लावणार होत तिथले पोपट गोविंद भवरे, कौशल्य भीमा भवरे,सतीश भवरे,अशोक भवरे यांच्या वस्तीतील वृद्ध तरूण ग्रामस्थ यांचेशी बसून सरांनी संवाद साधला.त्यांना सांगताना आदिवासी भिल्ल समाज हा अनेक गोष्टीपासून आज देखील वंचित आहे. शिक्षण नसल्याने तुम्हाला अनेक त्रासाला सामोरं जावं लागत आहे म्हणून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या.व्यसनापासून दूर राहून शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन समाजात आपली प्रतिमा कशी उंचावेल हे पाहणं देखील आपलं कर्तव्य आहे.याची जाणीव करून दिली वस्तीवरच्या एका चिमुकल्याला आपल्या मांडीवर बसवून त्याच्याशी हितगुज करणारा पहिला अधिकारी वस्तीने पहिला सगळं त्यांच्या साठी स्वप्नवत होत.त्यांचे वस्तीवरील रस्ते, त्यांना घरकुल योजना तसेच संजय गांधी योजना, शिधापत्रिका,पीएम किसान व आदिवासी विकासाच्या योजना खरंच पोहचल्या की नाही खात्री केली असता त्यातील बऱ्याच योजना आम्हाला माहित नाहीत आणि बऱ्याच योजना तलाठी आम्हाला सांगतात असं कळलं मग जे जाणवलं त्यात चर्चा करत असताना क्षेत्रीय स्तरावर काम करणारे मेरड साहेब तलाठी आम्हाला कायम मदत करतात आणि पदरमोड करून दाखले काढून देतात हे लोकांनी मनापासून सांगितलं त्यानी आधार कार्ड काढून दिले आणि तलाठी मेरड इथले पोलीस पाटील वाघमारे आणि कोतवाल लतीफ भाई ह्यांचं इथलं कार्य वाखाण्याजोगं आहे.असा शेरा शाबासकी देखील क्षीरसागर सरांनी दिली.सगळं झालं कि राजू भाऊ मेरड यांनी आपल्या माणिकदौंडी गावातील तलाठी कार्यालयात येण्याविषयी विनंती केली साहेबांनी त्यांना आधीच सांगितलं होत विनाकारण कार्यालयात बसून वेळ घालवण्या ऐवजी अजून लोकांपर्यंत आजच्या सुट्टीच्या दिवशी आपल्याला जाता येइल लोक पण भेटतील पण भाऊसाहेबांच्या हट्टापुढे त्यांचं काहीच चाललं नाही त्यांनी येण्याचे कबुल केले राजाभाऊ मेरड यांच्या कार्यालयात पोहचता क्षणी साहेबांच्या नजरेत सुंदर अस कार्यालय आणि त्या लागत भाऊसाहेबांनी व त्यांच्या सहकार्यांनी केलेलं वृक्षारोपण कार्यलयात लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची बसण्याची व माहिती दर्शक बोर्ड हि बाब तात्काळ लक्षात आली पाठीवर हात ठेवत साहेबानी सगळ्यांचं कौतुक केलं कार्यालयात गेल्यावर प्रसन्न अश्या वातावरण स्वच्छता, महापुरुषाचे फोटो ह्या सोबत मेरड भाऊसाहेबांना मुख्यमंत्री महोदय ह्यांच्या हस्ते भेटलेल्या पुरस्काराचे देखील कौतुक केलं.आलेल्या दोन युवकांसोबत सवांद साधत पुन्हा नव्याने नवा विषय घेऊ अन भेटू पण आज हाती घेतलेल्या कामाला पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करत आम्ही त्यांचा निरोप घेतला आजचा दिवस सत्कारणी लागला असं म्हणत आम्ही नगरचा रस्ता धरला.
