संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-ग्रामीण भागात देखील संशोधक वृत्ती दडलेली असते फक्त कल्पना शक्तीला वाव मिळाली की ते सहज शक्य होते.

असाच एक अनोखा शोध संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचोली गुरव येथील बापलेकाने आपला वडिलोपार्जित वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळत आधुनिकतेला तंत्रज्ञानाची जोड देत कल्पनाशक्तीच्या जोरावर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे अवघ्या ३० ते ४० हजार रुपयात कोळपणी यंत्र बनवले आहे.हे अत्याधुनिक कोळपणी यंत्र बनवण्यासाठी त्यांना साधारणपणे २ महिन्याचा कालावधी लागला.हया यंत्राला पुढच्या बाजूने ५ एच.पि इंजन बसवले असून स्वयंचलित चालण्यासाठी त्याला एक्सीलेटर सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे.त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे यंत्र शेतकऱ्यांना किफायतीशिर ठरणार आहे.चिंचोली गुरव येथील अतिशय सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील रामनाथ सोनवणे व समाधान सोनवणे या बापलेकाने आपला वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळात असतानाच कुठेतरी शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावे तसेच त्यांच्या शेतात कमी वेळात जास्त काम व्हावे आणि पैशाचे देखील बचत व्हावी यासाठी एक आगळेवेगळे आत्याधुनिक कोळपणी यंत्र तयार केलें आहे. ह्या यंत्राद्वारे आपल्या शेतामध्ये असणारे सोयाबीन,मका,कपाशी आदी पिकांची कोळपणी तर होणारच आहे.परंतु आपल्या शेतात वाफे अथवा सरी पाडण्यासाठी देखील या यंत्राचा उपयोग होणार असुन फवारणी मशीन देखील या यंत्रावर बसवणार असल्याचे बाप लेकाने सांगितले आहे.त्यामुळे या बापलेकाने बनवलेल्या या बहुउपयोगी यंत्राची सर्व दूर चर्चा होताना दिसून येत आहे.पुढील काळात हे पिता-पुत्र शेताची नांगरणी व पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना परवडेल असा अत्याधुनिक पद्धतीचा ट्रॅक्टर ते बनवणार असल्याचा मानस यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.या कोळपणी यंत्रामुळे संगमनेर तालुक्यातील गुरव चिंचोली गावाचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत ठरेल याचा आम्हाला अभिमान वाटेल असे सोनवणे पिता पुत्रांनी या वेळेस बोलताना सांगितले.
