पाथर्डी प्रतिनिधी (दि.२३ ऑगस्ट):-पाथर्डी तालुक्यातील वैजुबाभूळगाव येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपींना अद्यापही अटक न झाल्यामुळे समस्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करण्याबाबत एकमताने निर्णय घेतला व तसे निवेदन ही जिल्हाधिकारी यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वैजुबाभूळगाव येथील लोकनियुक्त महिला सरपंच सौ.ज्योती संतोष घोरपडे त्यांच्या कुटुंबीयांवर दि.22 जुलै 2023 रोजी राजकीय वादातून गावगुंडाडून प्राणघातक हल्ला झाला आहे.हल्ला करणाऱ्यांमध्ये बाळासाहेब घोरपडे,ज्ञानेश्वर घोरपडे,साईनाथ (किशोर) घोरपडे,आंबादास घोरपडे,उत्तम घोरपडे,नितीन घोरपडे,सुशील घोरपडे,गणेश घोरपडे यांचा समावेश असून त्यांच्यावर पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून हे आरोपी गुन्हेगारी स्वरुपाचे असून त्यांच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.तरी सदरील आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी.मुख्य आरोपींवर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही अथवा त्यांना अटक नाही.आरोपी हे राजरोसपणे मोकाट फिरत आहेत.यांना शासनाचा कुठलाही धाक उरलेला नाही त्यामुळे गावातील शांतता धोक्यात असून गावातील वातावरण दहशतीचे निर्माण झालेले आहे.सदरील आरोपीकडून सरपंच व त्यांच्या कुटुंबास व गावातील सर्वसामान्य लोकांस धोका निर्माण झालेला आहे.संबंधित आरोपीकडून पीडित कुटुंबावर व कुटुंबातील लहान मुलांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याची सत्यता पडताळून निपक्षपाती चौकशी करण्यात यावी.तसेच या संदर्भात आपणास ग्रामपंचायत कार्यालय वैजुबाभूळगाव यांचे पत्र दि:०१ ऑगस्ट रोजी दिले होते व आमरण उपोषण दि.०७ ऑगस्ट २०२३ रोजीचे पत्र दिले होते.परंतु प्रशासनाला वेळ देण्याच्या व सहकार्य करण्याच्या उद्देशाने उपोषण तूर्तास स्थगित केले होते.परंतु हल्ल्यातील मुख्य आरोपींना आजतागायत अटक झालेली नाही.त्यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे व भीतिचे वातावरण झालेले आहे.त्यामुळे समस्त ग्रामस्त वैजुबाभूळगाव यांच्या वतीने दि.२५/०८/२०२३ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

