अहमदनगर (दि.२३ ऑगस्ट):-जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन वाहनचालकाचे बळजबरीने पैसे हिसकवणारे आरोपी जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.2 ऑगस्ट रोजी लोणी सय्यदमीर येथुन एक पिकअपचालक व त्याचा कामगार हे त्यांचे आगरबत्ती व चिप्स याचा व्यवसाय असल्याने त्या मालाची डिलेव्हरी देवुन जात असताना तीन इसमांनी लोणी सय्यदमीरच्या पुलाच्या जवळ त्यांची मोटारसायकल पिकअप चालकास आडवी लावुन त्यांना चिप्स मागितले असता पिकअप चालक यांनी सदर माल हा पँकबद आहे तो देता येणार नाही असे सांगत असताना तीन इसमांपैकी एका इसमाने सदर पिकअपचालक यांची पैशांची बँग हिसकवण्याचा प्रयत्न केला.तेव्हा पिकअपचालक (फिर्यादी) हे लगेचच निघाले असता सदर तीन इसमांनी त्यांचा पाठलाग करुन अजुन एका इसमास सदर बाबत कल्पना देवुन त्याने वाटेफळ येथे पिकअप चालकास त्याची मोटरासायकल आडवी लावुन मागील मोटारसायकल वरील तीन इसमांनी येवून वाटेफळ गावाचे जवळ ब्रीज जवळ गाड्या आडव्या लावुन यातील पिकअप चालक यास इसम नामे शुभम उर्फ बाबु दिलीप चौधरी याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकुन भोकसले व तीन इसमांपैकी भवानी पवार याने कामगाराचे दात रॉडने पाडले.व सागर वाळके याने तो रॉड घेवुन फिर्यादी यांचे हातावर मारला.व शुभम उर्फ बाबु दिलीप चौधरी याने यातील पिकअफ चालक यांचे वडील व भाऊ त्यांना वाचविण्यासाठी आले असता त्यांचे भावाला सुद्दा जिवे ठार मारण्याचे उद्देशाने चाकुने भोकसले.त्यांचे वडीलांना आरोपीतांनी दगडाने मारले.व शुभम मोकळे व सागर वाळके यांनी पिकअपचालक यांची गाडीतील पैशांची बँग त्यातील 13,650 रुपये घेवून त्यांचे मोटारसायकलवर बसुन पळुन गेले.त्या अनुशंगाने नगर तालुका पोलीस स्टेशनला 1) भवानी पवार पुर्ण नाव गाव माहीत नाही 2) सागर अशोक वाळके रा.लोणी सय्यदमीर ता.आष्टी जि.बीड 3) शुभम उर्फ श्रीकेशर बंडु मोकळे रा. वाटेफळ ता.जि.अहमदनगर 4) शुभम उर्फ बाबु दिलीप चौधरी यांचे विरोधात I-597/2023 भा.द.वि.कलम 307,327,325,341,336,324,323,504,427,34नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण व पोलीस पथकास आरोपीतांचा शोध घेण्यासाठी सुचना व मार्गदर्शन केले होते. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करत असताना पोकाँ/राजु खेडकर यांनी तांत्रीक विश्लेषनाद्वारे सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) सागर अशोक वाळके रा.लोणी सय्यदमीर ता.आष्टी जि.बीड 2) शुभम उर्फ श्रीकेशर बंडु मोकळे रा.वाटेफळ ता.जि. अहमदनगर हे अर्धपिंप्री ता.गेवराई जि.बीड येथे असल्याचे कळाल्याने सपोनि शिशीरकुमार देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण व तपास पथकास सदर ठिकाणी जावुन आरोपीतांस ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी रवाना होवुन पथकाने आरोपीतांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपतराव भोसले यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा.पो. निरीक्षक शिशीरकुमार देशमुख,पो.उपनिरीक्षक युवराज चव्हाण,पोहेकाँ/सुभाष थोरात,पोकाँ/राजु खेडकर,पोकाँ/कमलेश पाथरुट,पोकाँ/विक्रांत भालसिंग,पोकाँ/संभाजी बोराडे,पोकाँ/विशाल टकले मोबाईल सेलचे पोकाँ/नितीन शिंदे,राहुल गुंडु व चासफो/दिनकर घोरपडे यांनी केलेली आहे.
