प्रतिनिधी(दि.२२ ऑगस्ट):-छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा (डिबी) कार्यरत असून या शाखेचे काम पूर्ण शहरात असून गुन्हे उकल करण्याचे काम प्रामुख्याने या शाखेचे असते.या शाखेचे तात्कालीन पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी गुन्ह्यांची उकल करण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यात डिटेक्शन मध्ये पारंगत असलेल्या अधिकाऱ्यांना व अंमलदारांना गुन्हे शाखेत घेतले होते.त्यास तात्कालीन पोलीस आयुक्तांनी ही मान्यता दिली होती.पोनि.आघव यांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी आलेले नूतन पोलीस निरीक्षक संदिप गुरमे यांनी अद्यापही नवीन डीबी स्थापन केलेली नाही.त्यामुळे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा वर्षा कांबळे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत सध्या जिल्ह्यात तनावाचे वातावरण कायम असून गुन्हे शाखेच्या निरीक्षकांनी शहरात गस्त वाढवून गुन्हेगारीला आळा बसवला पाहिजे असे ट्विटरवर आपले मत मांडले आहे.
