प्रतिनिधी (दि.२२ ऑगस्ट):-संगमनेर तालुक्यातील जमजम कॉलनी येथे छापा टाकुन महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे गोमास,साधने व टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमास विक्री करणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अमलदारांना कळविले आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे अब्दुल कुरेशी रा.जुना जोर्वे रोड,संगमनेर हा महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांची कत्तल करुन,गोमास एका छोटा हत्ती टेम्पोत भरत आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती स्थागुशा पथकास कळवून नमुद ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेशित केले.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील प्राप्त माहिती प्रमाणे खात्री करुन जुना जोर्वे रोड,जमजम कॉलनी,संगमनेर परिसरात ठिकाणी कारवाई करुन ६०० किलो गोमास व तुकडे,एक सत्तुर,एक सुरा व एक छोटा हत्ती टेम्पो असा एकुण ४,२०,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे अब्दुल हमिद अहमद कुरेशी,महंमद समशाद आलम शेख (फरार ) दोन्ही रा.जमजम कॉलनी या दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री. सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,पोना/सचिन आडबल,संतोष लोढे,गणेश भिंगारदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,अमृत आढाव यांनी केलेली आहे.
