अहमदनगर (दि.२२ ऑगस्ट):-तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने हद्दीत विविध ठिकाणी यशोदानगर भाजी मार्केट,श्रमिकनगर,कोंड्यामामा चौक,बोल्हेगांव गावठाण देठे वस्ती येथे अवैध दारू गावठी हातभट्टी धंद्यावर छापा टाकून 12,700/रू.किं.ची 127 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु जप्त केली.ही कारवाई दि.21 ऑगस्ट रोजी करण्यात आली असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे प्रोहीबीशन ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग,तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे,पो.उप.नि/समाधान सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाठ,पोना/अविनाश वाघचौरे,अहमद इनामदार,वसिम पठाण,सुरज वाबळे,संदिप धामणे,पोकॉ/सतिष त्रिभुवन,शिरीष तरटे,सचिन जगताप,दत्तात्रय कोतकर,गौतम सातपुते,सतिष भवर,संदिप गि-हे यांनी केली आहे.
