अहमदनगर (दि.२६ ऑगस्ट):-जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभूळगाव येथील महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्यानंतर मुख्य आरोपीवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी २५ ऑगस्ट रोजी सुरु केलेले आमरण उपोषण आज शनिवार दि.२६ ऑगस्ट रोजी देखील भर पावसात सुरू असून पोलिसांनी आतापर्यंत फक्त तीन आरोपींनाच अटक केलेली असून परंतु या घटनेतील मुख्य इतर आरोपी गावात अद्यापही मोकाट फिरत आहेत.या घटनेला साधारणपणे वीस ते पंचवीस दिवस झाले असून परंतु या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यात पाथर्डी पोलीस अपयशी ठरले आहेत त्यामुळे पाथर्डी पोलिसांच्या कामकाजावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.या प्रकरणाचा तपास पाथर्डी पोलीस निरीक्षकांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण असल्याकारणाने त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी केली आहे.आज उपोषणस्थळी नगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी भेट दिली होती.
परंतु महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या इतर आरोपींना देखील जोपर्यंत अटक केले जात नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला.आत्ता उपोषण सोडल्यावर पुन्हा गावी परतल्यानंतर देखील आरोपींकडून आमच्या जीविताला धोका आहे त्यांना कायद्याचा धाक बसलाच पाहिजे असे देखील ग्रामस्थांचे म्हणणे असून त्यामुळे भरपावसात देखील हे आमरण उपोषण ग्रामस्थांनी सुरूच ठेवले आहे.
