अहमदनगर (दि.२७ ऑगस्ट):-चोरीतील मोटरसायकल व मोबाईल विक्री करण्यासाठी बीड येथे घेऊन जात असताना तीन जणांना कोतवाली पोलिसांनी पकडले,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आपल्या पथकासह इम्पिरियल चौकात नाकाबंदी करून वाहनांची झडती घेत असताना चोरीचा मुद्देमाल घेऊन जाणारे तीघे कोतवाली पोलिसांच्या हाती लागले आहेत.तीन जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी दोघे विधी संघर्ष बालक असून, सनि जितेंद्रसिंग गोवे (वय १९, रा. चिंचोली, ता. पाटोदा जि.बीड) असे तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. शहरातील इम्पेरियल चौकात दि.२५ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिसांनी वाहनांची झडती घेण्यासाठी नाकाबंदी केली होती.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दुचाकीवरून येत असलेल्या तीन जणांवर संशय आल्याने त्यांनी तिघांना अडवून झडती घेतली असता चोरीतील एक दुचाकी व चार मोबाईल मिळून आले. आरोपींना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव शिरूर आणि भीमा कोरेगाव परिसरात चार मोबाईल नागरिक रस्त्यावरून बोलत जात असताना जबरदस्तीने हिसकावल्याची कबुली त्यांनी दिली. चोरीतील हा मुद्देमाल विक्री करण्यासाठी बीड येथे घेऊन जात असल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या तिघांनी दिली आहे. चोरी केलेली दुचाकी व चार मोबाईल असा ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, तनवीर शेख, गणेश धोत्रे, राम हंडाळ, सतीश भांड, गणेश ढोबळे, विजय गावडे, संतोष बनकर, अर्जुन फुंदे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
