प्रतिनिधी (दि.२७ ऑगस्ट):-मुंबईतील विद्याविहार स्टेशन नजीकच्या नेव्ही कॉलनी पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कोहिनूर मॉल तसेच हॉस्पिटल परिसरात रात्रीच्या कामावरून घरी जाणाऱ्या महिलांना काही टगे रोडरोमिओ कायम त्रास देऊन त्यांच्या छेड काढत असत
तसेच काही महिलांचा तर घरापर्यंत पाठलाग करत हे लोक जात होते.त्यामुळे या महिलांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता व कायम या गोष्टीचा त्यांना त्रास होत होता.या महिलांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा वर्षा कांबळे यांची भेट घेऊन दररोज होणाऱ्या त्रासाबद्दल याची माहिती दिली.वर्षा कांबळे यांनी मागेपुढे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस कमिशनर यांना ट्विटरद्वारे मेसेज करून माहिती दिली. त्याला सकारात्मक उत्तर देऊन मुंबई पोलीस यांनी वर्षा कांबळे यांना आपल्या तक्रारीबाबत आम्ही संबंधित पोलीस ठाण्यांना कळविले आहे असे उत्तर कळविले व महिलांसाठी पेट्रोलिंग ची व्यवस्था केली जाईल असा मेल केला.यामुळे आता रात्री कामावरून घरी परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोलिंगच्या गाड्यांची व्यवस्था होणार आहे अशी माहिती वर्षा कांबळे यांनी दिली.
