श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.२८ ऑगस्ट):-श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे मागासवर्गीय युवकांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण महाराष्ट्रभर गाजले असून
या प्रकरणातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.युवराज नानासाहेब गलांडे व मनोज वसंत बोडखे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील कुणाल मगर, शुभम माघाडे,ओम गायकवाड,प्रणय खंडागळे यांना शेळी व कबूतर चोरल्या प्रकरणी हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.या घटनेनंतर जिल्ह्यात वातावरण तणावपूर्ण बनले होते.दरम्यान पोलिसांनी कार्यवाही करत या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले आहे.परंतु सर्व आरोपींना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
