कारागृहातील आरोपीचा भिंतींवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल
संगमनेर प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून कारागृहातील एका आरोपीने भिंतींवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.शुक्रवार दि.15 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शोहेब शब्बीर शेख या आरोपीला गेल्या काही दिवसांपासून संगमनेर येथील कारागृहामधील बराक नंबर एक मध्ये ठेवण्यात आले आहे.शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेख याने भिंतींवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याला तातडीने उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक आशिष आरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी शोहेब शेख याच्या विरोधात गुरनं 799/2023 भादंविक 309 प्रमाणे दाखल केला आहे.
अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे हे करत आहे.या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.