विक्रीसाठी घेऊन आलेला गावठीकट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर (दि.१८ सप्टेंबर):-आगामी येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थागुशा यांना जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाबत माहिती घेताना दि. १७ सप्टेंबर रोजी पोनि/श्री.आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे विजय भारशंकर रा. नेवासा हा हॉटेल वैष्णवी समोरील बानकर पार्कंग,शनिशिंगणापुर या ठिकाणी त्याचे कब्जात विनापरवाना बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगुन विक्री करण्याकरीता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांना माहिती कळविली व पंचाना सोबत घेवुन,खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
पथकाने लागलीच शनिशिंगणापुर येथील हॉटेल वैष्णवीचे समोरील बानकर पाकींगमध्ये सापळा लावुन त्या ठिकाणी एक संशयीत इसम मिळुन आल्याने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय विलास भारशंकर रा.बऱ्हाणपुर,ता. नेवासा,जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुस मिळुन आले.त्याबाबत त्याचे कडे बारकाईने विचारपुस करता त्याने गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन जात आहे अशी कबुली दिली.त्यास शनिशिंगणापुर येथील हॉटेल वैष्णवीचे समोरील बानकर पार्किंग मधून ताब्यात घेवून त्याचे कब्जामध्ये ३०,०००/- रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा, ५००/- रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ३०,५००/- रु. किं.चा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने या बाबत पोना/१२९३ गणेश प्रभाकर भिंगारदे नेम सायबर पो.स्टे.यांनी शनि शिंगणापुर येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. १७८/२०२३ आर्म ॲक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील कायदेशिर कार्यवाही शनि शिंगणापुर पोस्टे करीत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव उपविभाग शेवगांव यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/मनोहर गोसावी,पोना/रविंद्र कर्डिले,पोना/संदीप दरंदले,पोना/संतोष लोढे,पोना/गणेश भिंगारदे,संतोष खैरे पोलीस यांनी केली आहे.