
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगाव गटातील भोजापूर पूर चारी पट्ट्यात येणारे गावे नान्नज दुमाला,बिरेवाडी,काकडवाडी,सोनोशी पारेगाव खुर्द,तळेगाव दिघे,तिगाव, वडझरी आदी सर्वच गावांना भोजापूर द्वारे पाणी टेल पर्यंत लवकरात लवकर सोडा. अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल.
येथील शेतकऱ्यांचे दुष्काळात होणारे हाल आता तरी थांबावा यासाठी आज नान्नज दुमाला येथे सर्वच गावातील शेतकऱ्यांच्या वतीने ६ वाजता निर्धार सभा संपन्न झाली.लवकर भोजापूर पाणी सोडले गेले नाही तर येणाऱ्या काही दिवसात शासकीय विभाग, मुख्यमंत्री,उपुख्यमंत्री,आमदार,मंत्री,खासदार व संबंधित पाटबंधारे खात्याला निवेदने देऊन आमरण उपोषण करून सरकारला आमचे हक्काचे पाणी सोडण्यास भाग पाडू असे बोलताना शेतकऱ्यांनी म्हटले आहे.सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.खरिपाची पिके देखील करपली आहे.पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचाही आणि चाऱ्याचा देखिल मोठा प्रश्न निर्माण झाले आहे.त्यामुळे आता आमचे हक्काचा असणारा पाणी आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला उग्र रूप धारण करावे लागेल.आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागेल.असे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले आहे.याप्रसंगी बोलताना शेतकरी पांडुरंग फड,किसनराव चत्तर,सरपंच भाऊसाहेब कडनर,प्रकाश रोकडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.याप्रसंगी पंचक्रोशीतील सर्वच गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.