
संगमनेर (राजेंद्र मेढे):-ना कुठलीही सजावट ना कुठलाही देखावा फक्त मनोभावे गणपती बाप्पाचे पूजन करत संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे पत्रकार दत्तात्रय घोलप यांची ४ वर्षीय कन्या हिंदवी हिने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये तसेच मातीच्या गणपती बाप्पाची मूर्ती असल्या कारणाने पाण्यात विघटन लवकर होते म्हणून मातीच्या चिखलापासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची अगदी साधेपणाने घरीच प्रतिष्ठापना केली आहे.तिने बनवलेले या सुबक अशा गणपती मूर्तीचे व तिचे परिसरातील नागरिक कौतुक करत आहेत.