
अहमदनगर (दि.२० सप्टेंबर):-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हददीत शेंडी शिवार येथे चोरीच्या मोटारसायकली जवळ बाळगणा-या एकास पकडुन त्याच्या ताब्यातून २,१३,०००/-रुपयाच्या ५ मोटारसायकली व १६ मोटारसायकलीचे सुटटे केलेले पार्ट,इजिंन व चेसी असा मुददेमाल जप्त करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.
बातमीची हकीकत आशिकी,दि.19 सप्टेंबर रोजी सपोनि/ राजेंद्र सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,नगर औरंगाबाद रोडला कृष्णा अॅटो कन्सटल्ट येथे काही मोटारसायकली व मोटारसायकलचे खोललेले इंजिन चेसी व इतर साहित्य पडलेले असुन ते चोरीचे असण्याची शक्यता आहे.अशी बातमी मिळाल्याने सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन त्यांना पंचासमक्ष सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी पाठविले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक कृष्ण ॲटो कन्सल्ट येथे जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी पाच मोटारसायकली व 17 मोटारसायकलचे सुटटे केलेले पार्ट मिळुन आले.या बाबत दुकान मालक पांडुरंग गोविंद शिंदे यांचे कडे त्यांच्या कागदपत्राची मागणी केली असता त्यांचे कडे कसलेही बिले तसेच मोटारसायकलचे कागदपत्रे मिळुन आले नाही.मोटारसायकल हया चोरीच्या असल्याचे संशय आल्याने त्या जप्त करुन इसम नामे पांडुरंग गोविंद शिंदे रा.शेंडी ता.जि. अहमदनगर याचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरजिनं 866/2023 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोहेकॉ/मोहमद शेख,पोहेकॉ/थोरवे, पोहेकॉ/अनिल आव्हाड, पोहेकॉ/फकीर शेख,पोना/दिपक गांगर्डे/पोना/राजु सुद्रीक,पोना/बंडू भागवत, पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/ तांदळे,पोकॉ/दहिफळे,/पोकॉ वंजारी यांनी केली आहे.