
पारनेर प्रतिनिधी (दि.२० सप्टेंबर):-पारनेर तालुक्यात गोरेगाव येथील सुतकडा परिसरात बिबट्याचा नेहमीच वावर असतो.मागील 15 दिवसापूर्वी 1 बिबट्या जेरबंद झाला होता .त्यानंतर येथे 8 दिवसापूर्वी बिबट्याने पशुधनावर हल्ला करून शेळी व कुत्रे फस्त केले होते.यामुळे ग्रामस्थ धास्तावले असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावला होता.बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
ग्रामस्थांनी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसताच वन विभागाला माहिती दिली.बुधवारी वनकर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यातील बिबट्याला गाडीत टाकून नेण्यासाठी सुतकडा वस्ती येथे दाखल झाले आहेत.गोरेगाव येथील सुतकडा व परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे.मोठे लपन क्षेत्र,दाट झाडी व भोवताली दरी असल्याने या ठिकाणी बिबट्यांचे अस्तित्व आहे.
आत्तापर्यंत या भागात 6 बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सुतकडा येथील अशोक तांबे, गौरव तांबे,प्रदीप तांबे यांच्या घराजवळ बिबट्याचा वावर होता या बिबट्याने पशुधनावर हल्ला चढवत शेळ्या व कुत्रे फस्त केले होते.संदीप भिमाजी तांबे यांच्या घराजवळही या बिबट्याचा वावर होता.या भागात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने कायमस्वरूपी पिंजरा लावण्यात आलेला आहे.याच पिंजऱ्यात त सकाळी सहा वाजता सहावा बिबट्या जेरबंद झाला आहे. शेतेता पाणी भरण्यासाठी सौ शैला अशोक तांबे यांच्या निदर्शनास आले.यानुसार वन विभागाने पिंजरा लावून त्यामध्ये भक्ष्य ठेवल्यानंतर हा बिबट्या बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेरबंद झाला.बुधवारी या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असले तरी या भागात आणखी बिबट्यांची संख्या असल्याची शक्यता व्यक्त करीत बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ॲड.प्रवीण तांबे यांनी केली आहे.
बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवून वनविभागाला माहिती पुरवून मदत करण्याच्या कामी स्थानिक नागरिक यावेळी अशोक तांबे, प्रदीप तांबे,संदीप तांबे,गौरव तांबे,प्रथमेश पानमंद, अभिजित तांबे,अभिषेक तांबे,मयुर तांबे,धूर्व तांबे,गोविंद तांबे, राजू पानमंद, तुकाराम तांबे, स्वप्नील नरसाळे,अण्णा तांबे, प्रदीप तांबे, तुषार तांबे,अमोल तांबे,सुतकडा मित्र मंडळ गोरेगाव,कणीक साबळे, वणपाल भाळवणी,सुर्यवंशी-वनमजूर आदी उपस्थित होते.वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे यांच्या मार्गदर्शनाख वनपरिमंडळ अधिकारी के.एस.साबळे. पी. व्ही.सोनवणे, वनरक्षक एन. व्ही. बडे, आय.एफ शेख यांनी बिबट्या जेरबंद होणे कामी कारवाई केली.दरम्यान या बिबट्याला पारनेर येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे.त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर माळशेज घाटात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.