
शिर्डी प्रतिनिधी (दि.२१ सप्टेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी जवळील सावळी विहीर येथे खळबळ जनक घटना घडली असून,
एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून दोघे गंभीर जखमी आहे.परंतु स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे चक्र वेगाने हलविले व हत्या करणाऱ्या आरोपींना नाशिक जिल्ह्यातून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चार तासातच यश आले आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव,संदिप चव्हाण,रवींद्र कर्डिले,विशाल दळवी,जालिंदर माने,कोतकर यांनी केली आहे.