शहराचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेश मंदिर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा
अहमदनगर (दि.१९ सप्टेंबर):-माळीवाडा येथील नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे श्री गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते आज श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी श्रेया ओला,मान्या ओला,वेदांत ओला,विशाल गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर,शहराचे आमदार संग्राम जगताप, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे,पुजारी संगमनाथ महाराज आदिसह विश्वस्त उपस्थित होते.