
अहमदनगर (दि.२३ सप्टेंबर):-नगर शहरात गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.यामुळे नगर शहरातील सर्व रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. पावसामुळे अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे.तसेच काही ठिकाणी वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे गणेश मंडळाचे मंडप पाण्यात बुडाले आहेत.तर शहरातील उड्डाणपुलाखाली कमरे इतके पाणी साचल्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा मोठा खोळंबा झाला आहे.हवामान खात्याने 23 सप्टेंबर व 24 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला होता.