
परभणी (नंदाताई लोखंडे):- परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील ॲड.संदीप दात्रे यांच्या कुटुंबियांनी समाजाला एक नवा पर्याय दिला आहे.
स्त्रीला दुसरे नाव लक्ष्मी असे देखील आहे.बहुजन समाज मातीच्या लक्ष्मीचे पूजन करतो पण खऱ्याखुऱ्या लक्ष्मीची मात्र अवहेलना करत करतो.पण संपूर्ण कुटुंब जेव्हा परिवर्तनवाद स्वीकारते त्यावेळी समाजात एक नवा पायंडा पडल्याशिवाय राहत नाही.संदीप दात्रे यांच्या आई आणि वडिलांनी अपार कष्ट करून मुले शिकवली.या शिकलेल्या मुलांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.
आपल्या दोन्हीही मुलांचे शाम आणि विठ्ठल यांचे लग्न त्यांनी सत्यशोधक पद्धतीने केले.तर सर्व सण आणि उत्सव सुद्धा ते पारंपारीक पद्धतीना डावलून करतात.यासोबतच आत्ताच त्यांनी ९ सप्टेंबरला नवीन घरात गृहप्रवेश केला तो सुद्धा सत्यशोधक पद्धतीनेच आणि कालच्या महालक्ष्मीच्या पूजनाला त्यांनी नवा पर्याय दिला तो म्हणजे त्यांनी महामातांच्या फोटोचे पूजन केले आणि आपल्या सुना स्वरा आणि ईश्वरी यांचे पूजन केले म्हणजेच जीवंत लक्ष्मीचे पूजन केले.मागील वर्षीही त्यांनी अशाच पद्धतीने सण साजरा केला होता.त्यांचे या परिवर्तनवादी विचाराचे समाजात तसेच जिल्ह्यात कौतुक होत आहे. समाजात नवा विचार पेरणाऱ्या या कुटुंबाचे नंदाताई लोखंडे राष्ट्रीय संयोजिका बहुजन मूलनिवासी महिला संघ यांनी मनस्वी अभिनंदन केले आहे.