
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पठार भागात फिरणाऱ्या तिघांना घारगाव पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे.
संतोष काशिनाथ कुटे (वय ३२, रा. मांडवे बुद्रुक, तालुका संगमनेर), शिवाजी बाबुराव कुदनर (वय २७ राहणार शिंदोडी, तालुका संगमनेर), संतोष शिवराज बर्डे (वय २८, राहणार शिंदोडी तालुका संगमनेर) असे अटक केलेल्या तिघा आरोपींचे नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी संगमनेर घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की,गावठी कट्टा कमरेला बांधून तिघे संग्राम हॉटेल,साकुर ते टाकळी ढोकेश्वर रोडवर मांढरे मांडवे बुद्रुक शिवार परिसरात बसलेले असल्याची माहिती मिळाली.पोनि/खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे आणि पोकॉ/प्रमोद अशोक गाडेकर व फलीस नाईक चौधरी असे खाजगी वाहनांवर त्या ठिकाणी पोहोचले सायंकाळी सापळा रचून या तिघांना छापा टाकून पकडले असता त्यातील संतोष काशिनाथ कुटे याच्या कमरेच्या डाव्या बाजूला एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला.
तर शिवाजी बाबुराव कुदनर याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात तीन जिवंत काडतुसे मॅक्झिनसह मिळून आले तसेच संतोष शिवराज बर्डे याची अंगझडती घेऊन विचारपूस केली असता तो शिवाजी कुदनरच्या सोबत आला असल्याची माहिती समजली.गावठी कट्टा व जिवंत काडतुसे रणजीत बापू धुळगंड (राहणार मांडवे बुद्रुक, तालुका संगमनेर) याच्याकडून खरेदी केली असल्याचे शिवाजी कुदनर याने सांगितले.याबाबत पोलीस अमलदार प्रमोद अशोक गाडेकर यांनी फिर्याद दिली असून वरील तिघां विरुद्ध भारतीय हत्यारे कायदा कलम ३/२५ ५७ याच्यासह ३७ (१) (३) चे उल्लंघन १२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहे.