
संगमनेर(दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील तळेगाव-निमोण गटातील गावांना वरदान ठरणाऱ्या भोजापूर चारी नंबर ५ मधून आज वाटमादेवी डोंगरकडे ६० क्यूसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

भोजापूर चारी मध्ये येणारे असंख्य अडथळे भोजापुर पाट पाणी नवनिर्माण संघर्ष समिती,जलसंधारण व जलसंपदा यंत्रणेच्या अथक प्रयत्नाने दुर करण्यात आले आहे.लवकरात लवकर तिगाव टेलपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी समिती रात्रंदिवस प्रयत्नशील आहे. भोजापुर चारी नंबर ५ मधून पाणी सोडताच समितीच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला.लाभ क्षेत्रातील शेवटच्या गावपर्यंत पाणी पोहचवनारच असा मानस संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसह समितीचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.