
अहमदनगर (दि.५ ऑक्टोबर):-नगर शहरातील नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर गजराज नगर शेजारील एका पेट्रोल पंपावर गोळीबाराची घटना नुकतीच घडली असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
ही गोळी त्यांच्या डोक्यात घुसली असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष साक्षीदारानी दिली आहे.पोलिसांना ही माहिती कळताच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर जखमी झालेल्या या इसमास खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही गोळीबारची घटना कोणत्या कारणातून झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहे.