Maharashtra247

माझा मोबाईल परत दे म्हटल्याचा राग येऊन मित्रानेच मित्राला केले फॅक्चर जीवे ठार मारण्याची दिली धमकी;कोतवाली पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत मारहाण करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

अहमदनगर (दि.५ ऑक्टोबर):-मित्राला लुटणाऱ्या सराईत आरोपीस कोतवाली पोलिसांनी केली अटक,घटनेतील सविस्तर माहिती अशी की,यातील फिर्यादी मिथुन भिमराव सकट (रा.सुवर्ण नगर,बाणेश्वर मंदीराजवळ,केडगाव अहमदनगर) यांनी दिनांक ०३ ऑक्टबर २०२३ रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, दि.३१/०८/२०२३ रोजी कायनेटीक चौकात उभा असताना ओळखीचा मित्र आकाश पवार रा.केडगाव तेथे आला व त्याने माझ्या कडून मोबाईल फोन मागून त्याच्या घरी फोन करण्यासाठी मागीतला मी त्याला फोन दिला असता आरोपी याने लगेच त्याची पांढरी रंगाची मोपेड गाडीवरुन रेल्वेस्टेशन कडे गेला त्यानंतर अर्धा तासाने परत आला त्यावेळी मी तेथेच उभा होतो.

त्यावेळी मी माझा मोबाईल फोन आरोपीकडे मागीतला असता आरोपी याने फोन देण्यास नकार दिला व बोलला कोण तू मला कधी दिला.त्यानंतर आरोपी याच्या खिश्यातील फोन मी काढून घेतला असता त्याचा राग आल्याने आरोपीने मी माझ्या मोटार सायकल क्रमांक एम एच १६ डी एफ २५.३४ कडे जात असताना आरोपी आकाश पवार हा पाठीमागुन आला व माझ्या डाव्यापाया वरती लवणीमध्ये बुटाच्या जोराच्या लाथा मारले असता मी खाली पडलो असता तरी देखील आरोपी हा मला मारहाण करीत होता त्यानंतर आरोपी आकाश पवार याने माझ्या खिशातील २५००/- रु बळजबरीने काढून घेतले तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच जबर मारहाण करुन माझे पायाचे हाड मोडुन व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

वगैरे मजुकर प्रमाणे फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस ठाणे गु.र.न. २०४८/२०२३ भादविक ३२५,३२७,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.कोतवाली पोलिसांना गुप्तबातमी दारा मार्फत बातमी मिळाली की,आरोपी आकाश अशोक पवार रा. केडगाव ता जि.अहमदनगर हा केडगाव परिसरात वावरत आहे.त्यावरुन कोतवाली पोलिसांचे पथकानी आरोपीस केडगाव वेस या ठिकाणी जाऊन आरोपीस तात्काळ जेरबंद केले व त्याच्याकडून २५००/- रु रोख हे हस्तगत करण्यात आले.गुन्हयाचा पुढील तपास पोसई/प्रविण पाटील व त्याना मदतनीस पोकॉ/याकुब सैय्यद हे करीत आहेत.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली व सुचने प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री/चंद्रशेखर यादव, पोसई/प्रविण पाटील,पोना/ रविद्र टकले,पोकॉ/दिपक रोहकले,पोना/शाहीद शेख, पोकॉ/प्रमोद लहारे,पोकॉ/सचिन लांडगे व पोकॉ/याकुब सय्यद यांनी केली आहे.

You cannot copy content of this page