येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा,तब्बल ३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,११ जुगारी ताब्यात
अहमदनगर (दि.५ ऑक्टोबर):-संगमनेर खुर्द येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तब्बल 3,26,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून 11 जुगाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहे.
बातमीची हकीकत अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर, स्थानिक गुन्हे शाखा हे जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की,जुना संगमनेर पुणे रोडवर,संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीवरील पुलाचे पुढे,एका घराचे आडोशाला काही इसम जुगार खेळत आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणजी जावुन खात्री करता काही इसम एका खोलीत गोलाकार बसुन हातामध्ये पत्ते घेवुन पैशावर हारजीतीचा तिरट जुगार खेळताना दिसले.
पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला व तेथे बसलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता बसलेल्या इसमांनी त्यांची नावे 1)शुभम गोपाल शाहु,रा.साईनगर,ता. संगमनेर, 2)प्रशांत एकनाथ जोरवेकर,रा.जोर्वे रोड,ता. संगमनेर, 3) राजेंद्र मल्लु गायकवाड,रा.शिवाजी नगर, ता.संगमनेर, 4) वसंत दुर्गा शिंदे,रा.रायतेवाडी फाटा,ता. संगमनेर, 5) दशरथ शिवराम भुजबळ,रा.जय जवान चौक, ता.संगमनेर, 6) बाळासाहेब भिमा मांडे, 7) नवनाथ कारभारी पानसरे दोन्ही रा. जाखोरी,ता.संगमनेर, 8) जुबेर नवाब शेख,रा.फातीमा सोसायटी,ता.श्रीरामपूर, 9) दिनेश शाम जाधव,रा.अकोले नाका,ता.संगमनेर,10) अनिल एकनाथ राक्षे ,रा. संगमनेर खुर्द,ता.संगमनेर असे सांगितले.ताब्यातील इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 3,26,400/- रुपये किंमतीची रोख रक्कम, विविध प्रकारच्या 5 मोटार सायकल, 8 मोबाईल फोन व जुगाराची साधने असा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुध्द संगमनेर शहर पो.स्टे.गु.र.नं. 833/23 मजुकाक 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कार्यवाही संगमनेर शहर पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती.स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री.सोमनाथ वाघचौरे उविपोअ,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/दतात्रय गव्हाणे,पोना/सचिन आडबल,पोना/ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे,पोकॉ/जालिंदर माने,आकाश काळे,शिवाजी ढाकणे यांनी केली आहे.