Maharashtra247

बाराबाभळी सैनिकनगर येथे आशेचे द्वार प्रतिष्ठानच्या वतीने गरजवंतांना ब्लॅंकेट वाटप 

अहमदनगर (दि.५ ऑक्टोबर):-आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना बाराबाभळी सैनिकनगर येथे गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम आशेच द्वार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने पार पाडले.

बाराबाभळी सैनिक नगर येथे आशेचेद्वार प्रतिष्ठान या सामजिक संस्थेच्यावतीने गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जोसेफ पवार,प्रशांत खावडिया,सचिन जाधव आणि संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर प्रदीप लोंढे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सभासद याकोब खरात यांचे योगदान लाभले.अहमदनगर विभागाचे सुपर वायझर रघुनाथ हुंबरे तसेच दीपक क्षेत्रे,रवींद्र साळवे,गावचे उपसरपंच प्रकाश घोरपडे आणि ग्रामस्थ आकाश सोनवणे,शुभम शिंगारे,आशोक दळवी,भाऊसाहेब आल्हाट,इतर ग्रामस्थ उपस्थित होते.संस्थेच्या कार्या बदल उपसरपंच प्रकाश घोरपडे यांनी यावेळी आभार मानले.

You cannot copy content of this page