रोलबॉल क्रीडा स्पर्धेत तक्षिला स्कूल सुवर्णपदकाचे मानकरी
अहमदनगर (दि.५ ऑक्टोबर):-जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचलनालय आयोजित तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर व अहमदनगर जिल्हा रोल बॉल संघटना आयोजित जिल्हास्तर शालेय रोल बॉल स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध ९ शाळेतील १०६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला यामध्ये तक्षिला स्कूलच्या १७ वर्षाच्या मुलींच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत सिल्व्हर ओक अकॅडमी संघाला ०-२ अश्या फरकाने नमवित सुर्वणपदक पटकविले.कु. श्रेया गीते गोलकीपर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघावर एकही गोल होऊ दिला नाही.स्नेहा दळवी ने आपल्या अनुभवाची शिदोरी घेऊन क्षेत्र रक्षण केले, व पांपिता बिस्वास व जागृती बागल या दोघींनी जोरदार हल्ला करत संघास विजय मिळवून दिला,जागृतीने आपल्या कलागुणाने विरुद्ध संघास खेळवत २ गोल केले.
त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्य सौ.जयश्री मेहत्रे,समन्वयक श्री.तन्वीर खान,सौ.कोमल व्हिजन,सौ. वासंती तिर्मल तसेच शिक्षक वृंद यांनी कौतुक करत आगामी होणाऱ्या पुणे विभागीय स्पर्धेस शुभेछा दिल्या.वरील सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री.प्रदीप पाटोळे,सौ.अश्विनी नन्नवरे, श्री.जावेद शेख,श्री.सचिन आळकुटे यांचे मार्गदर्शन लाभले.