Maharashtra247

गोरेगाव मध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट नागरिक धास्तावले

गोरेगांव (ॲड.प्रविण तांबे):-पारनेर तालुक्यातील गोरेगाव परिसरातील बोरठीका क्षेत्रात पुन्हा एकदा शेतातील पाईपलाईन फोडून लोखंडी बारे,कॉक चोरीच्या घटना जास्त प्रमाणात वाढल्या आहेत.

आतापर्यंत अंबादास तांबे,चिमभाऊ मेजर,राजाराम नरसाळे, बाळासाहेब मोरे,रामदास मोरे, किसन विठोबा नरसाळे, रामदास नाना नरसाळे, शिवाजी लक्ष्मण नरसाळे,यशवंत जनाजी नरसाळे, रेवजी चत्तर,छबू चत्तर,संपत अंबादास नरसाळे,सचिन रामदास तांबे या शेतकऱ्यांच्या शेतातील पाईपलाईनचे बारे दगडाने फोडून लोखंडी प्लेट नट बोल्ट,लोखंडी इअर वॉल , लोखंडी कॉक ठिबकचे कॉल चोरट्यांनी चोरून नेले आहेत.याबाबत परिसरातील शेतकरी अत्यंत संतप्त झाले आहे.

You cannot copy content of this page