
अहमदनगर (दि.६ ऑक्टोबर):-निर्जनस्थळी नेऊन खुनाचा प्रयत्न करणारे दोघांना जेरंबद करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.
दि.२७ सप्टेंबर २०२३ रोजी घटनेतील फिर्यादी महेश बाबासाहेब आरु (रा.गजानन कॉलनी, नवनागापुर,ता.जि. अहमदनगर) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास विखे पाटील हॉस्पीटल चायना गेट जवळ बंद पडलेल्या शेडमध्ये आरोपी १)हर्षद गौतम गायकवाड, २)बाळु शंकर काळे यांनी मागील भांडणाचे कारणावरुन धारदार हत्याराने डोक्यावर वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरनं. ८९२/२०२३ भादंवि कलम ३०७,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदर गुन्हयातील आरोपी नामे १)हर्षद गौतम गायकवाड,२) बाळु शंकर काळ हे विळद बायपास या ठीकाणी लपुन बसले आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यानुसार सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना विळद बायपास येथे पाठविले.पोलीस पथकाने विळद बायपास येथुन सदर आरोपीना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले.
व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) हर्षद गौतम गायकवाड,रा.दुध डेअरी चौक,विखे पाटील कॉलेज रोड,वडगाव गुप्ता शिवार ता. जि.अहमदनगर २) बाळु शंकर काळे,रा.चेतना कॉलनी,नवनागापुर ता. जि.अहमदनगर असे सांगीतले.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/राजेंद्र गायकवाड,पोसई/दिपक पाठक,पोसई/योगेश चाहेर, पोना/विष्णु भागवत,पोना/राजु सुद्रिक,पोना/महेश बोरुडे,पोकॉ/किशोर जाधव,पोशि/नवनाथ दहिफळे,पोकॉ/सचिन हरदास तसेच मोबाईल सेलचे मपोना/ रिंकु मटेकर,पोकॉ/राहुल गुंडु, पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली आहे.